Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

सेलू पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध दारू व्यवसायावर मोठा आघात, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

Author Image
Written by
Roshan Wandile

पोलीस स्टेशन सेलूचे नवीन ठाणेदार पंकज वाघोडे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात राबविलेल्या धडक मोहिमेमुळे तालुक्यातील अवैध दारू व्यवसायाला मोठा हादरा बसला आहे. लाखो रुपयांचा मोहफुल सडवा नष्ट करून पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असून नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनाक १८/०६/२०२६ रोजी डी.बी. पथकातील मनोहर मुडे, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, विनायक गोडे तसेच हिंगणी बीटचे जमादार प्रशांत श्रीवास्तव, शरद इंगोले व गंगाधर तांबारे यांनी हिंगणी शिवारात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईदरम्यान अनिल चिचघरे (रा. शिवणगाव) याच्या मालकीचा सुमारे ₹67,300 किमतीचा मोहफुल सडवा जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. त्यानंतर बोरी शिवारात करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत आरोपी पठाण याच्या ताब्यातील सुमारे ₹2 लाख 40 हजार किमतीचा मोहफुल सडवा शोधून नष्ट करण्यात आला. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

सेलू पोलिसांनी अवैध दारू व्यवसायाविरोधात उचललेल्या या कठोर पावलामुळे दारू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, अनेक वर्षांनंतर प्रथमच सेलू शहर व परिसरातील अनेक अवैध दारू विक्रीचे अड्डे बंद झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी पोलिस प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले आहे. कायद्याचा धाक निर्माण करून समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ठाणेदार पंकज वाघोडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली असून भविष्यातही अशाच धडक कारवाया सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अवैध धंद्यांवर लगाम लावून समाजहित जपणाऱ्या सेलू पोलिसांच्या या कारवाईची सध्या तालुकाभर चर्चा असून नागरिकांकडून पोलिस प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

हो

शुक्रवार, 14 अगस्त 2026

आज का सुविचार

परिवर्तन ही सृष्टि का नियम है। जो व्यक्ति समय के साथ खुद को बदलने के लिए तैयार रहता है, वही प्रगति कर सकता है। बदलाव से डरें नहीं, बल्कि उसे एक नए अवसर के रूप में स्वीकार करें।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp