
बजरंग दल सेवा सप्ताहानिमित्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दल वर्धा जिल्हा तसेच विश्व हिंदू परिषद सेवा विभागाच्या वतीने श्री दत्त देवस्थान, बढे चौक, वर्धा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.श्री दत्त मंदिराची साफसफाई करून स्वच्छता, सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश दिला. मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या उपक्रमात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती व स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समाजसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून राबविण्यात आलेल्या या अभियानाचे नागरिकांनी स्वागत करून कार्यकर्त्यांच्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले.या वेळी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत स्वावलंबी भारत प्रमुख अटल पांडे,विहिप वर्धा जिल्हा अध्यक्ष सुभाष राठी, विहिप वर्धा जिल्हा मंत्री शरद कोणप्रतिवार, विहिप वर्धा जिल्हा सहमंत्री व श्री दत्त देवस्थानचे अध्यक्ष अरविंद कोकाटे, सहमंत्री संजय पोफळी, विहिप वर्धा जिल्हा विशेष संपर्क प्रमुख गजानन मसाये, विहिप जिल्हा कोश्याध्यक्ष व श्री दत्त देवस्थान सदस्य अतुल देशपांडे,विहिप वर्धा जिल्हा कार्यालयीन प्रमुख मारोती सातपुते, बजरंग दल जिल्हा संयोजक महेश राऊत, सहसयोजक अमोल अतकर,वर्धा शहर विहिप मंत्री सुधीर मानकर, देवस्थान सदस्य विठ्ठल व्यवहारे,बजरंग दल वर्धा शहर संयोजक किरण उपाध्ये,नगर सहसयोजक अमन मिश्रा, सत्सग प्रमुख गोविंद पांडे, यश श्रीवास्तव, वर्धन बघेल, नीरज भोयर, नीरज पाल, विजय चिलानी, रोहित पांडे,रवींद्र चाफेकर या वेळी उपस्थित राहून या स्वच्छता अभियानास सहकार्य केले.








