Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

बोरधरणात कायद्याला आव्हान! ठेका असूनही गुंडांचा हैदोस; दादागिरी, मारहाण, चोरीच्या आरोपांनी खळबळ भाग – १

Author Image
Written by
Roshan Wandile

बोरधरण, प्रतिनिधी रोशन वांदिले : सेलू तालुक्यातील बोरधरण जलाशयातील मत्स्यव्यवसायाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत असून, कायदेशीर ठेका देऊनही प्रत्यक्ष कामकाज सुरू होऊ न शकल्याने ठेका संचालक कंपनी वर आर्थिक नुकसानाची टांगती तलवार, शासनाच्या नियमानुसार ई-टेंडर प्रक्रियेद्वारे मे अमय मल्टी सोल्यूशन प्रा.ली. या कंपनीला  मत्स्यव्यवसायाचा ठेका देण्यात आला असला, तरी आदर्श मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित हिंगणी च्या आडमुठेपणा मुळे व संस्थेतील काही लीडरगिरी करणाऱ्या व्यक्तीमुळे कामकाज ठप्प असल्याचे कळले आहे.

महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळाचा बोर जलाशय ठेका पद्धतीने चालविण्यासाठी ई-निविदा काढून दिनांक 06/03/2026 पासून मे अमय मल्टी सोल्यूशन प्रा.ली. ला कायदेशीर पणे पुढील १० वर्षा करिता जलाशय ठेक्याने देण्यात आले आहे. मात्र, काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून मच्छी पकडण्याच्या कामात अडथळे निर्माण करून काम बंद पाडले जात असल्याचा गंभीर आरोपही समोर आला आहे.

मे अमय मल्टी सोल्यूशन प्रा.ली. या कंपनीने सर्व शासकीय अटी व शर्तींची पूर्तता करून कायदेशीररित्या ठेका मिळविल्याचे सांगितले जात आहे.हा ठेका चालवण्या साठी कंपनीने जवळपास एक कोटी रुपयाची गुंतवणूक केल्याचे सांगतले तसेच शासन नियमानुसार स्थानिक मासेमार्याना प्राधान्य देऊन त्यांना इतरांपेक्ष्या अधिक लाभदायक दर देण्याचा निर्णय कंपनीने घेतला असल्याचे सांगितले जात आहे तरी देखील आदर्श मच्छिमार सहकारी संस्था मर्या.हिंगणी याच्या पदाधिकाऱ्या कडून अजून अधिक दरांची गैरवाजिब मागणी करून कामात अडथला निर्माण केला जात असल्याचे दिसून येत आहे.

दादागिरी, धमकी आणि मारहाणीचे गंभीर आरोप

बोरधरण परिसरात काही स्थानिक व्यक्तींकडून बाहेरगावाहून आलेल्या गरीब मच्छीमार आणि मजुरांना धमकावणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण करून कामावरून हाकलून देण्याचे प्रकार घडत असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. स्थानिक असल्याचा फायदा घेत काही जण दहशतीचे वातावरण निर्माण करत असल्याची तक्रार ठेका संचालक कंपनी द्वारे करण्यात येत आहे.

कामासाठी आलेल्या अनेक गरीब कुटुंबांना भीतीपोटी काम सोडावे लागत असून त्यांच्या रोजगारावर थेट परिणाम झाला आहे. “काम करू दिले जात नाही, विरोध केल्यास धमक्या दिल्या जातात,” असा आरोप कंपनी द्वारा करण्यात येत आहे.ठेका संचालक कंपनी हि मत्स्य व्यवसायातील अग्रगण्य कंपनी असून बोर जलाशय प्रकल्पाचे सर्वांगीण विकास करण्याच्या कंपनीच्या हेतूवर स्थानिक मच्छिमार संस्था कुठार घात करत असल्याचे दिसून येत आहे

रात्री मच्छी चोरीचे गंभीर आरोप

जलाशय परिसरात रात्रीच्या वेळी मच्छीची चोरी करून तिची अवैध विक्री केली जात असल्याचे गंभीर आरोप होत आहेत. रात्रीच्या वेळी देखरेखीचा अभाव असल्याने अशा प्रकारांना वाव मिळत असल्याचा आरोप आहे. या कथित प्रकारांमुळे शासनाचा महसूल, ठेका धारक कंपनीचे नुकसान होत आहे. या सर्व प्रकारांमागे संगनमत असल्याचा संशय व्यक्त होत असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. क्रमश: भाग २

महाभारत न्यूज विशेष

महाभारत न्यूज या प्रकरणाची सखोल माहिती घेऊन सत्य बाहेर आणणार असून, संबंधित गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे धाबे दणाणून सोडणार आहे. त्यामुळे समोरील बातमी क्रमशः नक्की वाचा.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

बरे झाले पडले

शुक्रवार, 07 अगस्त 2026

आज का सुविचार

किसी भी समस्या का अंतिम हल केवल 'माफी' ही है, चाहे वो आप किसी से मांग लें या किसी को माफ कर दें। यह आपके मन के बोझ को तुरंत हल्का कर देती है।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp