Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Author Image
Written by
Roshan Wandile

हिंगणी, दि. २५ जून : ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या उद्देशाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, हिंगणी यांच्या वतीने हिंगणी येथील मुडे सभागृहात परिवर्तन प्रभाग संघाच्या वार्षिक सभेनिमित्त सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बहादुरे मॅडम व डॉ. मयूर नागमोते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये महिलांची असंसर्गजन्य आजार (NCD) तपासणी, रक्तदाब, मधुमेहासंदर्भातील आवश्यक तपासण्या, रक्त तपासणी तसेच गरजेनुसार औषधोपचार करण्यात आले. आरोग्यविषयक समस्यांचे वेळेवर निदान करून योग्य उपचार घेण्याचे महत्त्वही यावेळी उपस्थित महिलांना समजावून सांगण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेले पाणी त्वरित हटविणे, डासांची उत्पत्ती रोखणे आणि वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करणे याबाबत सविस्तर जनजागृती करण्यात आली.यावेळी दि. २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची माहिती देत ० ते ५ वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओच्या दोन थेंबांपासून वंचित राहू नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच मुलींसाठी एचपीव्ही (HPV) लसीकरणाचे महत्त्व, त्याचे आरोग्यदायी फायदे आणि वेळेत लसीकरण करून घेण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर नागमोते, आरोग्य सहाय्यक वैभव कदम, आरोग्य सेवक संदीप कोहळे, गटप्रवर्तक श्रीमती छबुताई नहारे, एचएलएल कविता पाटील (सिस्टर) तसेच उपकेंद्रातील सर्व आशा सेविका यांनी सक्रिय सहभाग नोंदवून शिबिर यशस्वी केले. आरोग्यदायी गावाच्या संकल्पनेला बळकटी देणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत मोठ्या संख्येने आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

<span class=‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न">
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

बरे झाले पडले

शुक्रवार, 14 अगस्त 2026

आज का सुविचार

परिवर्तन ही सृष्टि का नियम है। जो व्यक्ति समय के साथ खुद को बदलने के लिए तैयार रहता है, वही प्रगति कर सकता है। बदलाव से डरें नहीं, बल्कि उसे एक नए अवसर के रूप में स्वीकार करें।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp