Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

Author Image
Written by
Ganesh Khodke

प्रतिनिधी : शुभम सराफ, हिंगणी

हिंगणी : “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या उपक्रमांतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हिंगणी व धामणगाव येथे मोठ्या उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध मान्यवर, ग्रामस्थ व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

दि. 05 जून 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगणीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती बहादुरेडॉ. मयूर नगमोते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरणाचे रक्षण, हरित परिसर निर्मिती आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारची वृक्षलागवड करण्यात आली.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत हिंगणीच्या प्रशासक मा. श्रीमती दामिनीताई डेकाटे, ग्रामविकास अधिकारी श्री. अतुल भोगे, मा. प्रमोदरावजी डेकाटे, ग्रामपंचायत लिपिक श्री. शंकरराव बोरले, धामणगावचे पोलीस पाटील श्री. अमोल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच आरोग्य सेवक श्री. संदीप कोहळे, आरोग्य सेविका श्रीमती संगीता मांढरे, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचत गटांच्या सदस्या तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षारोपण केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षांचे महत्त्व विषद करत प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन रोखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमात लावण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या उपक्रमामुळे गाव परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ व आरोग्यदायी बनण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

📌 फोटो कॅप्शन :
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करताना.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

<span class=जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण">
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

महिला आरक्षण विधेयक पडले

शुक्रवार, 07 अगस्त 2026

आज का सुविचार

किसी भी समस्या का अंतिम हल केवल 'माफी' ही है, चाहे वो आप किसी से मांग लें या किसी को माफ कर दें। यह आपके मन के बोझ को तुरंत हल्का कर देती है।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp