
सेलू शहरातील प्रभाग क्रमांक ५ येथे नागरिकांना भेडसावत असलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या समस्येबाबत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रभागातील काही ठिकाणी अनावश्यक मोटारी लावून तसेच अनधिकृत नळ कनेक्शनद्वारे पाण्याचा उपसा केला जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
यावेळी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने प्रभाग क्रमांक ५ ची पाहणी करून अनधिकृत नळ कनेक्शन व अनावश्यक मोटारींवर कारवाई करावी तसेच सर्व नागरिकांना समान व नियमित पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.
हे निवेदन रोशन विलासराव राऊत, विधानसभा संघटक शिवसेना शिंदे गट सेलू-वर्धा यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये रोशन अरुणराव कोंबे (सेलू तालुकाप्रमुख), प्रदीप सोडे (शिवसेना ओबीसी सेल सेलू तालुकाप्रमुख), ओम टौलारे (सेलू शहर प्रमुख) तसेच प्रभाग क्रमांक ५ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेलू शहरातील प्रभाग क्रमांक ५








