Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

सेलू बसस्थानकात प्रवाशांचे हाल; दूषित पाणी, बंद पंखे आणि अमली पदार्थ सेवनाच्या तक्रारींनी नागरिक संतप्त

Author Image
Written by
Ganesh Khodke

सेलू येथील मुख्य बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली तरी त्या पाण्याची टाकी दूषित झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. टाकीत कचरा साचलेला असून ती नियमित साफ केली जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याची तीव्र नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
यासोबतच बसस्थानक परिसरातील बहुतांश पंखे बंद पडलेले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे प्रवासी, विद्यार्थी तसेच नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. बसची वाट पाहताना उकाड्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, सेलू बसस्थानकात स्टॉप असलेल्या काही बसेस प्रत्यक्षात बसस्थानकात येत नसल्याची तक्रारही प्रवाशांनी केली आहे. याबाबत विचारणा केल्यास काही बस कर्मचारी प्रवाशांशी अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. बसस्थानकात लावण्यात आलेले हेल्पलाइन नंबरचे बोर्डही केवळ दिखावा ठरत असून त्या नंबरवर संपर्क साधला असता तो नंबर लागत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
याच दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बसस्थानकाच्या मागील बाजूस काही नशेडी अमली पदार्थांचे सेवन करताना दिसून आले असून त्यामध्ये काही मुलींचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे परिसरातील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. आज सेलू येथील भाजपा पदाधिकारी धीरज पवननारकर, आशिष मसराम,दिनेश माहुरे , मनोज केळझरकर यांचे उपस्थितीत शाळकरी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी एकत्र येत या संदर्भात प्रशासनाला निवेदन दिले. आठ दिवसांच्या आत परिस्थिती सुधारली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. दरम्यान, अशा अनेक तक्रारी सातत्याने समोर येत असताना महामंडळ प्रशासन मात्र झोपेत आहे का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

हो

शुक्रवार, 02 अक्तूबर 2026

आज का सुविचार

यदि आप सही हैं तो कुछ भी साबित करने की कोशिश न करें, बस सही बने रहें, समय खुद गवाही देगा। सत्य को किसी सहारे की आवश्यकता नहीं होती, वह आत्मनिर्भर होता है।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp