Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

सेलूतील हॉटेल व्यावसायिक संकटात! व्यावसायिक गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे व्यवसाय बंद होण्याच्या उंबरठ्यावर

Author Image
Written by
Ganesh Khodke

सेलू शहरातील हॉटेल व्यावसायिकांवर सध्या मोठे संकट ओढवले आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आले आहेत. या गंभीर समस्येबाबत हॉटेल व्यावसायिकांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेलू येथील जावदे गॅस एजन्सी कडून हॉटेल व्यावसायिकांना अनेक दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शहरातील अनेक हॉटेलमध्ये स्वयंपाक करणेच अशक्य झाले असून व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची वेळ आली आहे.
हॉटेल बंद असल्यामुळे तेथे काम करणाऱ्या कामगारांना पगार देण्यासाठी मालकांना बाहेरून कर्ज काढावे लागत आहे. त्यातच हॉटेलच्या खोल्यांचे भाडे वेळेवर भरता न आल्यामुळे मालकांवर हॉटेलच्या रूम खाली करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक हॉटेल मालकांचा संसार अक्षरशः उघड्यावर येण्याची भीती निर्माण झाली आहे. व्यवसाय बंद असल्यामुळे अनेक हॉटेल मालक कर्जबाजारी झाले असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
या संदर्भात जावदे गॅस एजन्सीचे मालक धर्मेंद्र जावदे यांना विचारणा केली असता, वरच्या स्तरावरूनच व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, हॉटेल व्यावसायिकांनी वर्ध्याचे पालकमंत्री यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. सेलूतील हॉटेल व्यवसायावर आलेल्या या गंभीर परिस्थितीकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन व्यावसायिक गॅस सिलेंडरचा नियमित पुरवठा सुरू करावा आणि हॉटेल व्यावसायिकांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
जर ही समस्या लवकरात लवकर सोडवली नाही, तर सेलू शहरातील अनेक हॉटेल व्यवसाय कायमचे बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

पत्रकार द्वारा एखाद्या महिलेचे शाब्दिक हनन करणे योग्य आहे का ?का ?

शुक्रवार, 02 अक्तूबर 2026

आज का सुविचार

यदि आप सही हैं तो कुछ भी साबित करने की कोशिश न करें, बस सही बने रहें, समय खुद गवाही देगा। सत्य को किसी सहारे की आवश्यकता नहीं होती, वह आत्मनिर्भर होता है।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp