Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

वर्धा जिल्ह्यात जलसंकटाची तयारी : 757 गावांसाठी 876 उपाययोजना मंजूर

Author Image
Written by
Ganesh Khodke

वर्धा, प्रतिनिधी :
उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाने व्यापक कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील 757 गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन 876 उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

योजनेअंतर्गत 192 गावांमध्ये 201 खासगी विहिरींचे अधिग्रहण, 103 गावांमध्ये 147 सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, तसेच 302 गावांमध्ये जलपुरवठा योजनांच्या 324 विशेष दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. याशिवाय 154 गावांमध्ये 198 नवीन बोअरवेल खोदण्याचा प्रस्ताव आहे. जुन्या बोअरवेलची दुरुस्ती आणि आवश्यकतेनुसार नवीन जलपुरवठा योजनाही सुरू करण्यात येणार आहेत.

दरवर्षी मार्चअखेर जिल्ह्यातील अनेक जलाशयांचा पाणी साठा कमी होतो. वाढत्या तापमानामुळे मे-जून महिन्यांत पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने संबंधित विभागांना तातडीने कामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. आवश्यकतेनुसार प्रभावित गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

दरम्यान, वर्धा शहर व आसपासच्या 14 गावांना महाकाली येथील धाम नदी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या येथे दोन दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होत असून पुढील काळात त्यात कपात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. धाम प्रकल्पात सध्या सुमारे 50 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.

प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे व जलसंवर्धनात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

हो

शनिवार, 15 अगस्त 2026

आज का सुविचार

अपने सपनों को इतनी शिद्दत से चाहो कि उन्हें हकीकत में बदलने के लिए ब्रह्मांड भी आपकी मदद करने पर मजबूर हो जाए। आपकी इच्छाशक्ति और कड़ी मेहनत ही आपके सपनों की उड़ान तय करेगी।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp