Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

सेलूच्या प्रज्वल भिंगारे यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून यशस्वी वाटचाल; गडचिरोली येथे नियुक्ती

Author Image
Written by
Shubham Saraf

सेलू | प्रतिनिधी : शुभम सराफ (हिंगणी)

दि. 9 जून 2026 रोजी महाराष्ट्रातील प्रतिष्ठित महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 127 चा दीक्षांत संचलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्यात सेलू येथील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक प्रज्वल भाऊराव भिंगारे यांनी यशस्वी सहभाग नोंदवत आपल्या मेहनतीचा मानाचा टप्पा गाठला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या 2022 च्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवत प्रज्वल भिंगारे यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली होती. पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण हे अत्यंत खडतर व आव्हानात्मक स्वरूपाचे मानले जाते. वर्षभर चाललेल्या प्रशिक्षणादरम्यान भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, स्थानिक व विशेष कायदे, फॉरेन्सिक विज्ञान, सायबर गुन्हे, गुन्हेशास्त्र यांसह विविध विषयांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय शारीरिक कवायत, गोळीबार सराव आणि योग प्रशिक्षणाचाही विशेष समावेश होता.

दीक्षांत संचलन सोहळ्यास महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रज्वल भिंगारे यांनी हे एक वर्षाचे कठोर प्रशिक्षण समर्पण, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर यशस्वीरीत्या पूर्ण केले. विशेष म्हणजे त्यांच्या स्टार ओपनिंग सेरेमनीचा मान त्यांच्या पालकांना मिळाला.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक म्हणून गडचिरोली परिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली आहे. प्रज्वल यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक असून आई गृहिणी आहेत.

त्यांचे प्राथमिक शिक्षण दिपचंद चौधरी विद्यालय येथे झाले, तर बारावीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय येथे पूर्ण केले. त्यांनी पदवी शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथून संपादन केले आहे.

समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एक निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी बनण्याचा त्यांचा मानस असून, आपल्या यशाचे श्रेय ते आई-वडील, भाऊ, आजोबा तसेच शिक्षकवृंद यांना देतात.

सेलूच्या सुपुत्राने मिळविलेल्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फोटो कॅप्शन :
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर दीक्षांत संचलन सोहळ्यात सहभागी झालेले परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक प्रज्वल भाऊराव भिंगारे.

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

“ग्राहक त्रस्त, अधिकारी मस्त? सेलू भारतीय स्टेट बँकेचा भोंगळ कारभार उघड; शाखा व्यवस्थापकांच्या मनमानीमुळे ग्राहक त्रस्त
आज फोकस में

“ग्राहक त्रस्त, अधिकारी मस्त? सेलू भारतीय स्टेट बँकेचा भोंगळ कारभार उघड; शाखा व्यवस्थापकांच्या मनमानीमुळे ग्राहक त्रस्त

उत्पन्न लाखोंचे… पण शंकरजी मंदिर अजूनही अंधारात!
आज फोकस में

उत्पन्न लाखोंचे… पण शंकरजी मंदिर अजूनही अंधारात!

सेलू शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील पाणीटंचाईबाबत शिवसेनेचे नगरपंचायतीला निवेदन
आज फोकस में

सेलू शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील पाणीटंचाईबाबत शिवसेनेचे नगरपंचायतीला निवेदन

आज का राशिफल

वोट करें

पत्रकार द्वारा एखाद्या महिलेचे शाब्दिक हनन करणे योग्य आहे का ?का ?

सोमवार, 15 जून 2026

आज का सुविचार

परिवर्तन ही सृष्टि का नियम है। जो व्यक्ति समय के साथ खुद को बदलने के लिए तैयार रहता है, वही प्रगति कर सकता है। बदलाव से डरें नहीं, बल्कि उसे एक नए अवसर के रूप में स्वीकार करें।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp