Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

वडगाव रोडवरील ओव्हरलोड ट्रॅकचा कहर ; नागरिक संतप्त, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Author Image
Written by
Ganesh Khodke

सेलू शहरातील वडगाव रोड परिसरात जुवाडी येथील जीनिंगमधून सुरू असलेल्या ओव्हरलोड ट्रॅक वाहतुकीमुळे नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य झाले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात भरलेल्या ट्रॅकच्या वाहतुकीमुळे रोडवरील इलेक्ट्रिक तारा तुटण्याच्या घटना सातत्याने घडत असून रात्री दोन-दोन तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे.

सध्या उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड वाढलेली असताना नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी रुग्ण यांचे या उष्णतेमुळे मोठे हाल होत आहेत. त्यातच वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित ट्रॅक चालक व जीनिंग व्यवस्थापनाला ट्रॅकमध्ये कमी लोड भरण्याची विनंती केली होती. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही ओव्हरलोड वाहतूक अजूनही सुरूच असल्याचा आरोप होत आहे.

या मार्गावर मोठ्या प्रमाणात केळी पिकविणारा व्यवसाय असून ओव्हरलोड ट्रॅकच्या वाहतुकीमुळे व्यापाऱ्यांचे देखील मोठे नुकसान होत आहे. रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी, तारांचा धोका आणि वीजपुरवठा खंडित होण्यामुळे व्यापारी वर्गही संतप्त झाला आहे.

दरम्यान, काल रात्री पुन्हा एका ओव्हरलोड ट्रॅकमुळे इलेक्ट्रिक तार तुटल्याची घटना घडली. संतप्त नागरिकांनी संबंधित ट्रॅक रोखून धरत जोरदार निषेध व्यक्त केला. “यापुढे अशी ओव्हरलोड वाहतूक आढळल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. याला संबंधित जीनिंग कंपनी आणि वीज वितरण विभाग जबाबदार राहील,” असा इशारा नागरिकांनी दिला.

रोजच्या या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले असून पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही? तसेच वारंवार लाईट बंद करण्यासाठी वीज वितरण विभाग कोणाच्या दबावाखाली मदत करत आहे का? असा सवाल आता परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.

वडगाव रोडवरील खाली आलेल्या विद्युत तारांची उंची तात्काळ वाढवून ओव्हरलोड वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, अन्यथा मोठा अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

महिला आरक्षण विधेयक पडले

शुक्रवार, 02 अक्तूबर 2026

आज का सुविचार

यदि आप सही हैं तो कुछ भी साबित करने की कोशिश न करें, बस सही बने रहें, समय खुद गवाही देगा। सत्य को किसी सहारे की आवश्यकता नहीं होती, वह आत्मनिर्भर होता है।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp