Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

“सेलूत दारूमाफियांवर पोलिसांचा प्रहार ; बोर नदी परिसरात खळबळ”

Author Image
Written by
Ganesh Khodke

दारू माफिया कुणाल पचारे फरार ; १.७९ लाखांचा मुद्देमाल उध्वस्त

सेलू प्रतिनिधी :
तालुक्यात अवैध दारू व्यवसायाने पुन्हा डोके वर काढले असून बोर नदी परिसरात सुरू असलेल्या मोहा दारूच्या भट्टीवर सेलू पोलिसांनी मंगळवार दि. 12 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास धडक कारवाई करत दारू माफियांचे धाबे दणाणून सोडले.

गुप्त माहितीच्या आधारे सेलू तालुक्यातील घोरड शिवारातील बोर नदीच्या काठावर, माधवराव झळके यांच्या शेतालगत झाडीपट्टीमध्ये सुरू असलेल्या अवैध मोहा दारू निर्मिती केंद्रावर पोलिसांनी अचानक छापा टाकला. यावेळी दारू माफिया कुणाल पचारे हा दारू भट्टीची तयारी करताना आढळून आला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच त्याने जंगलाच्या दिशेने पळ काढत घटनास्थळावरून फरार होण्यात यश मिळवले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल १६०० लिटर मोहा सडवा तसेच लोखंडी सहा ड्रम असा अंदाजे १ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष नष्ट केला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ६५ (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यात अवैध दारूचा महापूर वाढत असताना पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागात खुलेआम सुरू असलेल्या दारू व्यवसायामुळे युवक व्यसनाधीन होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा कारवाया सातत्याने करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार मनोज गबने यांच्या निर्देशानुसार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निरंजन वर्भे, जमादार तुषार भुते व पोलिस कर्मचारी मंगेश राऊत यांनी केली. पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

पत्रकार द्वारा एखाद्या महिलेचे शाब्दिक हनन करणे योग्य आहे का ?का ?

शुक्रवार, 14 अगस्त 2026

आज का सुविचार

परिवर्तन ही सृष्टि का नियम है। जो व्यक्ति समय के साथ खुद को बदलने के लिए तैयार रहता है, वही प्रगति कर सकता है। बदलाव से डरें नहीं, बल्कि उसे एक नए अवसर के रूप में स्वीकार करें।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp