Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

एसएससी निकालात दीपचंद चौधरी विद्यालयाची उत्कृष्ट कामगिरी; विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Author Image
Written by
Ganesh Khodke

९५.४४ टक्के निकाल; दिशा पोहाणे शाळेत प्रथम

ता. प्र. सेलू :
सेलू येथील दीपचंद चौधरी विद्यालयाने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल ९५.४४ टक्के लागला असून, कु. दिशा राजू पोहाणे हिने ९५.६० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

यावर्षी शाळेतून एकूण ३२९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे ६५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली असून, ११२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच १०२ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर ३५ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणीत यश मिळविले आहे.

शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. दिशा राजू पोहाणे हिने ९५.६० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. कु. जान्हवी दिवाकर माहुरे हिने ९३.०० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला, तर कु. दर्शना अनिल चलाख हिने ९१.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय कु. नंदिनी मारोतराव लाडे हिने ९०.४० टक्के व कु. कृतिका राजू नाईक हिने ८९.८० टक्के गुण मिळवून विशेष यश संपादन केले.

या यशाबद्दल मुख्याध्यापिका डॉ. कल्पना मकरंदे, पर्यवेक्षक हरिहर मुडे व गोपाल खंडागळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामागे वर्गशिक्षक मिथुन हांडे, नितीन वांदिले, प्रवीण घोडखंडे, सुनील झाडे, ज्योती लोडे, मंगेश वडुरकर, सुनील घोडमारे, प्रशांत चव्हाण, उमाकांत पिंपळापुरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.

शाळेच्या या घवघवीत यशामुळे विद्यार्थ्यांवर, शिक्षकांवर व पालकांवर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

पत्रकार द्वारा एखाद्या महिलेचे शाब्दिक हनन करणे योग्य आहे का ?का ?

शनिवार, 15 अगस्त 2026

आज का सुविचार

अपने सपनों को इतनी शिद्दत से चाहो कि उन्हें हकीकत में बदलने के लिए ब्रह्मांड भी आपकी मदद करने पर मजबूर हो जाए। आपकी इच्छाशक्ति और कड़ी मेहनत ही आपके सपनों की उड़ान तय करेगी।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp