Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

सेलूत अमानुष प्रकार! निराधार युवकावर बेदम मारहाण – पूर्वी समजुतीने सुटणारे वाद आता हिंसेकडे का वळले? सेलू चा बिहार झाला का?

Author Image
Written by
Ganesh Khodke

📍 सेलू/वर्धा प्रतिनिधी :
सेलू शहरात एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. एका आई-वडील नसलेल्या निराधार हिंदू युवकाला कोणतीही शहानिशा न करता काही कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून युवकाची उघड बदनामी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाने एका आपत्तिजनक फोटोबाबत माहिती जाणून घेण्यासाठी तो फोटो केवळ आपल्या जिवलग मित्राला पाठवला होता. त्याने तो फोटो कोणत्याही ग्रुपवर किंवा सार्वजनिक सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. मात्र, त्या मित्रासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने चॅटचा स्क्रीनशॉट काढून तो विविध सोशल मीडिया ग्रुप्सवर व्हायरल केला. या प्रकारातून गैरसमज निर्माण झाला आणि कोणतीही खातरजमा न करता काही लोकांनी त्या युवकावर हल्ला चढवला.
विशेष म्हणजे, पीडित युवक हा पूर्णतः निराधार असून त्याचे आई-वडील नाहीत. त्यामुळे या घटनेमुळे समाजात अधिक तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत.
⚖️ पूर्वी समजुतीने सुटलेले वाद – आता हिंसा का?
या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. काही वर्षांपूर्वी, मेश्राम डॉक्टर यांनी पाठक यांच्या घराजवळ नवरात्री उत्सवादरम्यान देवीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्या वेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी संयम राखत, बंधुभावाने समज देऊन विषय शांततेत मिटवला होता.
👉 मग आताच्या घटनेत संवाद आणि समजुतीऐवजी थेट मारहाण करण्याचा मार्ग का स्वीकारला गेला?
👉 कायद्याला बगल देत स्वतःहून शिक्षा देण्याची प्रवृत्ती वाढते आहे का?
हे प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहेत.
🌍 सेलूची ओळख धोक्यात?
सेलू शहर हे नेहमीच धर्मनिरपेक्षता, शांतता आणि एकात्मतेचे प्रतीक राहिले आहे. सर्व धर्मीय लोक येथे एकोप्याने सण-उत्सव साजरे करतात. मात्र, या घटनेमुळे शहराच्या सामाजिक सलोख्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
📢 जनतेचा संताप आणि इशारा
सर्व समाजातून या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.
👉 “चूक झाली असेल, तर कायदेशीर मार्गाने कारवाई व्हावी”
👉 “मारहाण करून न्याय देणे ही सरळ गुंडशाही आहे”
👉 “सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांवरही कारवाई व्हावी”
अशा मागण्या जोर धरत आहेत. दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर व्यापक आंदोलन उभे राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
🧭 संदेश स्पष्ट:
संवादातून मार्ग निघतो – हिंसेतून नाही!
न्याय हवा, पण कायद्याच्या चौकटीतच!

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

महिला आरक्षण विधेयक पडले

शनिवार, 15 अगस्त 2026

आज का सुविचार

अपने सपनों को इतनी शिद्दत से चाहो कि उन्हें हकीकत में बदलने के लिए ब्रह्मांड भी आपकी मदद करने पर मजबूर हो जाए। आपकी इच्छाशक्ति और कड़ी मेहनत ही आपके सपनों की उड़ान तय करेगी।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp