Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

हिंगणघाटमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची जोरदार मागणी; महाराष्ट्र दिनी आमदारांना निवेदन

Author Image
Written by
Ganesh Khodke

हिंगणघाट येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय शौर्य, धर्मरक्षण आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
सकल हिंदू समाज, हिंगणघाट यांच्या वतीने महाराष्ट्र दिन निमित्त आमदार समीर कुणावार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात हिंगणघाट बस स्थानक परिसरात संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
हिंगणघाट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा उभारणे हे केवळ एक स्मारक नसून हिंदू स्वाभिमान, अस्मिता आणि इतिहासाचा गौरव असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. धर्मासाठी अमानुष छळ सहन करूनही हिंदुत्वाचा ध्वज झुकू न देणाऱ्या संभाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करण्याची ही योग्य वेळ असल्याचेही नमूद करण्यात आले.
सकल हिंदू समाजाने स्पष्ट इशारा दिला असून, पुतळा उभारणीसाठी आवश्यक निधी मंजूर करून तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा आवाज बुलंद करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.
दरम्यान, आमदार समीर कुणावार यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
या उपक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवसेना, मराठा सेवा संघ आणि बजरंग दल यांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे.
निवेदन देताना विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये शरद कोणप्रतिवार, अमित गावंडे, रोशन नागमोते, श्याम इडपवार, अभय संचेती, ओमप्रकाश मस्कर, गजानन मसाये, अनुकूल कोचर, प्रशांत तिवारी, राम नक्के, सुरेंद्र आगरे, पंकज देशपांडे, देवा वाघमारे, प्रमोद टिपले, दीपक शर्मा, हर्षल लाखे, मनीष शेंडे, सुरेश बुराडकर, रवी नौकरकर, नरेंद्र गंधारे, संदीप नासरे, योगेश नासरे, धर्मा जोशी, राहुल फटिंग, शंकर गेडेकर, सूरज वरठी, राम खोकले, विक्की महाकाळकर, मुन्ना त्रिवेदी, श्रेयस वानोडे, आकाश छापेकर, सौरभ कावळे, रवी रोहनकर, मनीष तडस, अमित देवढे, सचिन उदासी, निशांत काकडे, सुरज कावळे, यश बोरुटकर, सचिन पाहाडे, दामोदर वानखेडे आदींचा समावेश होता.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

बरे झाले पडले

शनिवार, 03 अक्तूबर 2026

आज का सुविचार

जिंदगी में दो तरह के लोगों से हमेशा दूर रहना: एक व्यस्त और दूसरा घमंडी। क्योंकि व्यस्त अपनी मर्जी से बात करेगा और घमंडी अपने मतलब से आपको याद करेगा।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp