
सेलू : नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशन सेलू यांच्या वतीने कान्हापूर येथे “संवाद उपक्रम” उत्साहात पार पडला. या उपक्रमाचा मुख्य हेतू नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करणे तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखणे हा होता.
या कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांशी व विविध विभागातील कर्मचार्याशी व अधिकारी याच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. विविध विभागातील कर्मचार्याशी व अधिकारी यांना येणारे अडचणी संदर्भात व महिलांच्या सुरक्षेसंदर्भात नागरिकांनी आपले प्रश्न व चिंता मांडल्या. यावर पोलीस प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत आवश्यक त्या ठोस कारवाईचे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित गावातील नागरिकांशी व विविध विभागातील कर्मचार्याशी व अधिकारी कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे, सायबर गुन्ह्यांपासून सतर्क राहण्याचे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस व नागरिक यांच्यातील परस्पर सहकार्य वाढल्यास गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
“संवाद उपक्रम” हा केवळ औपचारिक बैठक न ठरता नागरिक आणि पोलीस यांच्यातील दरी कमी करणारा एक प्रभावी पूल ठरत आहे. या उपक्रमामुळे परिसरात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होत असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमांत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर ,सेलू पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रजी ठाकूर व इतर पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.








