Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

माजी सरपंच तथा अध्यक्ष महिला मोर्चा बीजेपी सेलू तालुका ज्योती घंगारे यांचे पोलिस निरीक्षक सेलू , पोलिस अधीक्षक वर्धा यांना निवेदन

Author Image
Written by
Ganesh Khodke
सोशल मीडिया माध्यमातून बदनामी करीत चरित्र हनन करणाऱ्या राजेश वरटकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करा

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकत एका प्रतिष्ठित महिलेचे चरित्र हनन करणारी बाब गेल्या आठवड्यात नुकतीच उघडकीस आली. त्याचा प्रत्येय थेट हाणामारी पर्यंत पोहचला आणि तालुक्यात त्या सोशल मीडिया ग्रूप ची तसेच झालेल्या हाणामारीची चर्चा सुरू झाली.
पत्रकार राजेश वरटकर यांना मेडिकल चौकात झालेल्या हाणामारी विरोधात सेलू तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदवित पत्रकार संरक्षण कायदा अन्वये संबंधित आरोपीवर कारवाई ची मागणी करण्यात आली होती.परंतु माजी सरपंच ज्योती घंगारे यांनी दिलेल्या निवेदनात पत्रकार राजेश वरटकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्या मुळे सदर प्रकरण आणखी तापणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
निवेदनात केलेल्या गंभीर आरोपानुसार घोराड येथील पत्रकार राजेश वरटकर हे गेल्या एक महिन्यापासून माजी सरपंच ज्योती घंगारे तसेच माजी उपसरपंच रामेश्वर घंगारे यांच्यावर प्रत्यक्ष तथा सोशल मीडिया ग्रूप वर नाहक बदनामी करीत होते. सदर बाबीवर आम्ही कोणतीही प्रतिक्रिया न देता गप्प होतो. परंतु दिनांक ०९/०४/२०२६ ला घोराड एक आदर्श गाव या सोशल मीडिया ग्रूप वर ज्योती घंगारे तसेच त्यांचे पती रामेश्वर घंगारे यांच्या सोबत मॉर्निंग वॉक ला जाणारे जितू टेकाडे यांच्या सोबत केलेल्या शाब्दिक युद्धात पत्रकार राजेश वरटकर यांनी आपण मॉर्निंग वॉक ला जाता की मॅडमच्या संरक्षणासाठी जाता का, तुम्हाला नवीन कामाच्या शुभेच्छा अशी अश्लीश टिपणी केली. सदर बाबी चा जाब विचारण्याकरिता ज्योती घंगारे यांनी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता तुम्हाला नवरे नाही का कशाला दुसऱ्या सोबत मॉर्निंग वॉक ला जाता असे उत्तर दिले.सदर बाबी मुळे ज्योती घंगारे यांचे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न झाला असा त्यांचा आरोप आहे. ज्योती रामेश्वर घंगारे या गेल्या दहा वर्षांपासून घोराड गावच्या सरपंच आहे तसेच बीजेपी पक्षाचा महिला मोर्चा सेलू तालुका अध्यक्ष आहे. समाजात एक सुजान नागरिक म्हणून ओळख असलेल्या महिलेवर जर अश्या प्रकारे चरित्र हनन करण्यात येत असेल तर ही बाब समाजाकरिता घातक आहे. सदर निवेदन पोलिस अधीक्षक वर्धा , मा. ना. डॉक्टर पंकज भोयर राज्य मंत्री तथा पालक मंत्री वर्धा यांना देण्यात आले. निवेदन देताना वैशाली येटवार, जिल्हा अध्यक्ष भाजपा महिला मोर्चा वर्धा, चित्रा ठाकूर विधानसभा प्रमुख भाजपा महिला मोर्चा ,श्रेया देशमुख महामंत्री भाजपा महिला मोर्चा, वंदना भुते नगरसेविका वर्धा ,ज्योती घंगारे अध्यक्ष भाजपा महिला मोर्चा सेलू तालुका, ज्योती सुर्वे संजय गांधी निराधार समिती सदस्य सेलू तसेच आजी माजी महिला पदाधिकारी उपस्थित होते.

राजेश वटकर यांनी सेलू येथील ठाणेदारांवर कार्यवाही न केल्याचा आरोप केला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार ठाणेदार देवेंद्र ठाकूर हे कर्तव्यदक्ष आणि जबाबदार अधिकारी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

बरे झाले पडले

शनिवार, 15 अगस्त 2026

आज का सुविचार

अपने सपनों को इतनी शिद्दत से चाहो कि उन्हें हकीकत में बदलने के लिए ब्रह्मांड भी आपकी मदद करने पर मजबूर हो जाए। आपकी इच्छाशक्ति और कड़ी मेहनत ही आपके सपनों की उड़ान तय करेगी।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp