Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

हिंगणीच्या सुभेदार वाडीत साकारणार संत गजानन महाराजांचे भव्य मंदिर महाशांती पूजेने झाला कार्याचा शुभारंभ

Author Image
Written by
Shubham Saraf

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात हिंगणी येथील सुभेदार वाडी येथे श्री संत गजानन महाराज मंदिराची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. रविवार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी मंदिर उभारणीच्या पार्श्वभूमीवर जागेची ‘महाशांती पूजा’ हिंगणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडली.
​या सोहळ्यासाठी हिंगणी आणि परिसरातील भाविकांनी पहाटेपासूनच सुभेदार वाडी परिसरात गर्दी केली होती. मंदिरासाठी नियोजित असलेल्या जागेवर विधिवत महापूजा करण्यात आली. उपस्थित गुरुजींच्या मंत्रोच्चाराने आणि ‘गण गण गणात बोते’ या नामस्मरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला होता. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेला महायज्ञ हिंगणीकरांच्या साक्षीने पूर्ण झाला असून, लवकरच मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.
​ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा प्राप्त
​हिंगणी नगरीला गजानन महाराजांच्या वास्तव्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तर भाविकांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन महाराज हिंगणी येथील सुभेदार वाडीत वास्तव्यास होते. त्यांनी तत्कालीन सुभेदार गणेश यादव यांना आशीर्वाद दिला होता.
​ श्री गजानन विजय ग्रंथाच्या २० व्या अध्यायातील ७५ वी ओवी या घटनेची साक्ष देते.
​महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भव्य मंदिर साकारले जात असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुभेदार वाडीतील हे प्रस्तावित मंदिर भक्ती आणि श्रद्धेचे मोठे केंद्र ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

केळझर येथे समोर आले कथित “लव्ह जिहाद” प्रकरण ; फोटो व्हायरल करण्याच्या धमकीत तरुणीचे वारंवार शारीरिक शोषण
आज फोकस में

केळझर येथे समोर आले कथित “लव्ह जिहाद” प्रकरण ; फोटो व्हायरल करण्याच्या धमकीत तरुणीचे वारंवार शारीरिक शोषण

वडगाव रोडवरील ओव्हरलोड ट्रॅकचा कहर ; नागरिक संतप्त, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

वडगाव रोडवरील ओव्हरलोड ट्रॅकचा कहर ; नागरिक संतप्त, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

“सेलूत दारूमाफियांवर पोलिसांचा प्रहार ; बोर नदी परिसरात खळबळ”
आज फोकस में

“सेलूत दारूमाफियांवर पोलिसांचा प्रहार ; बोर नदी परिसरात खळबळ”

एसएससी निकालात दीपचंद चौधरी विद्यालयाची उत्कृष्ट कामगिरी; विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
आज फोकस में

एसएससी निकालात दीपचंद चौधरी विद्यालयाची उत्कृष्ट कामगिरी; विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

सेलू तालुक्यात भागवत आयोजन समितीच्या उपक्रमाची सर्वत्र स्तुती
आज फोकस में

सेलू तालुक्यात भागवत आयोजन समितीच्या उपक्रमाची सर्वत्र स्तुती

🎯 MSCIT करूनही जॉब मिळत नाही? फक्त Exam Demo सोडवून काही उपयोग नाही! आजच्या काळात कॉम्प्युटर वर प्रत्यक्ष काम येणे खूप गरजेचे आहे.
आज फोकस में

🎯 MSCIT करूनही जॉब मिळत नाही? फक्त Exam Demo सोडवून काही उपयोग नाही! आजच्या काळात कॉम्प्युटर वर प्रत्यक्ष काम येणे खूप गरजेचे आहे.

आज का राशिफल

वोट करें

पत्रकार द्वारा एखाद्या महिलेचे शाब्दिक हनन करणे योग्य आहे का ?का ?

शुक्रवार, 15 मई 2026

आज का सुविचार

यदि आप सही हैं तो कुछ भी साबित करने की कोशिश न करें, बस सही बने रहें, समय खुद गवाही देगा। सत्य को किसी सहारे की आवश्यकता नहीं होती, वह आत्मनिर्भर होता है।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp