Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

गॅस अपडेटच्या नावाखाली खाते रिकामे! सायबर गुन्हेगारांचा नवा ट्रेंड

Author Image
Written by
Roshan Wandile

इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये चढ-उतार सुरू असताना सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा मार्ग अवलंबला आहे. “गॅस अपडेट” किंवा “KYC अपडेट”च्या नावाखाली नागरिकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारण्याचे प्रकार वाढत असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र मध्ये अशा प्रकारच्या काही तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल झाल्या असून, नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्हेगार मोबाईलवर कॉल, SMS किंवा WhatsApp संदेशाद्वारे संपर्क साधतात. गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची भीती दाखवत ते ग्राहकांना तात्काळ “अपडेट” करण्यास भाग पाडतात.यासाठी संबंधित व्यक्तींना बनावट लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांची वैयक्तिक माहिती, OTP तसेच बँकिंग तपशील गुन्हेगारांच्या हाती लागतात. त्यानंतर काही क्षणांतच संबंधितांच्या बँक खात्यातील रक्कम काढून घेतली जाते.

सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, तसेच OTP किंवा बँक तपशील कुणालाही देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. अधिकृत गॅस एजन्सीकडूनच येणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, सध्या अशा तक्रारींची संख्या मर्यादित असली तरी येत्या काळात या प्रकारात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक दक्षता बाळगणे आवश्यक आहे

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

हो

रविवार, 16 अगस्त 2026

आज का सुविचार

खुशियां छोटी-छोटी चीजों में छिपी होती हैं, बस उन्हें देखने वाली नजर चाहिए। दूसरों से तुलना करना छोड़ दें और जो आपके पास है, उसके लिए ईश्वर का आभार व्यक्त करें।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp