Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

पालकमंत्र्यांकडून सेलू तालुक्याला २५ कोटींच्या निधीची भेट

Author Image
Written by
Ganesh Khodke

विविध विकासकामांना गती; पूल, रस्ते, पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांवर भर
सेलू तालुक्याच्या विकासासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विविध विकासकामांसाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे तालुक्यातील प्रलंबित कामांना गती मिळणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मागील काही काळात तालुक्यातील भौतिक सुविधांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर या निधीतून प्रशासनिक इमारती, आरोग्य सेवा, बसस्थानक, शैक्षणिक सुविधा, ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा योजना, पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास, तसेच पूल बांधकाम यांसारख्या मूलभूत कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
या निधीतून येळकोळी–सुरगाव–सेलू मार्गावरील सुरगाव येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच आमगाव–सोडी–हिंगणी–शिवणी मार्गावरील हिंगणी गावाजवळील लहान पुलाचे बांधकाम आणि हिंगणी चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. बोरखेडी परिसरातील पुलासाठी सुमारे २ कोटी रुपयांचा निधी तर शहर ते राष्ट्रीय महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यांवर स्टील रेलिंग, बॅरिकेड्स व पेव्हर ब्लॉक्ससाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.
या सर्व कामांचा समावेश राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आला असून त्यामुळे सेलू तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. हा निधी मंजूर करून दिल्याबद्दल पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, या निर्णयामुळे तालुक्यातील पायाभूत सुविधा मजबूत होऊन नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

महिला आरक्षण विधेयक पडले

शुक्रवार, 02 अक्तूबर 2026

आज का सुविचार

यदि आप सही हैं तो कुछ भी साबित करने की कोशिश न करें, बस सही बने रहें, समय खुद गवाही देगा। सत्य को किसी सहारे की आवश्यकता नहीं होती, वह आत्मनिर्भर होता है।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp