
Written by
Ganesh Khodke
घोराड येथील विठ्ठल रुख्माई देवस्थान मध्ये दिनांक ४ मे ते १५ मे दरम्यान विनामूल्य बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्या शिबिराची सुरवात आजपासून सोमवारी होणार आहे.
शिबिराचे आयोजन संत केजाजी महाराज हरिपाठ मंडळ व केजाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
ह. भ. प. नरेश महाराज पाटील आळंदी व ह. भ. प. प्रमोद महाराज ठाकरे आळंदी हे या शिबिराचे मार्गदर्शक असून या शिबिरात बालकांना लाठी काठी , हरिपाठ, भगवतगीता, हनुमान चालीसा, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी ओव्या, मृदुंग, आदी विषय शिकविले जाणार आहे. यासाठी या क्षेत्रातील तज्ञ मंडळी शिक्षक म्हणून सेवा देणार आहे शिबिर . या शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यातील अधिकारी मंडळी आपली सेवा देणार आहे.हे शिबिर विठ्ठल रुख्माई देवस्थान चे सभागृहात होणार असल्याने भक्तिरसाचा आनंद बालकांना मिळणार आहे.या शिबिरीत इयत्ता ४ ते १२ मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भाग घेता येणार आहे.बालकांची राहण्याची, व भोजनाची व्यवस्था राहणार आहे.या शिबिरासाठी गावातील व परिसरातील नागरिकांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे ज्या बालकांना या शिबिरात भाग घ्यायचा आहे अशा बालकांनी किंवा पालकांनी डॉ. सुरेंद्र भुते, विजय माहुरे, पुरुषोत्तम गुजरकर, परसराम गोमासे, सौरभ पोहाणे , यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरात ज्या विद्यार्थ्यांना भाग घ्यायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत किंवा सायंकाळी ४ वाजता नंतर आल्यास प्रवेश मिळणार आहे . उन्हाचा वाढता पारा पाहता हा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.










