
सेलू येथील इंजिनिअर अतुल देवळे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे पाच जणांना नवजीवन मिळाले आहे.
४ एप्रिल रोजी झालेल्या भीषण अपघातात अतुल देवळे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने नागपूरमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी पाच दिवस अथक प्रयत्न केले, मात्र अखेर त्यांना ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आले.
अशा कठीण प्रसंगातही देवळे कुटुंबियांनी मोठेपणा दाखवत अवयवदानाचा निर्णय घेतला.
त्यांच्या यकृत, दोन्ही किडनी आणि डोळ्यांचे दान करण्यात आले…
या अवयवांमुळे पाच गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.
झेडटीसीसीच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
२०१३ पासून नागपूर विभागातील हे ९३वे अवयवदान असून, या वर्षातील आठवे यशस्वी प्रकरण ठरले आहे.
अतुल देवळे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या अवयवांच्या माध्यमातून ते पाच जणांच्या रूपाने जिवंत राहतील…
त्यांच्या कुटुंबाचा हा निर्णय समाजासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे.
👉 अवयवदान हीच खरी मानवतेची सेवा आहे…

दु:खातून मानवतेचा संदेश! देवळे कुटुंबाचा






