Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर तरुणीची रिधोरा डॅममध्ये उडी

Author Image
Written by
Ganesh Khodke

वर्धा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सेलू तालुक्यातील रिधोरा डॅम येथे एका 17 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथील रामनगर परिसरात राहणारी काजल गजानन रोकडे (वय 17 वर्ष) ही तरुणी काल सायंकाळी सुमारे 6 वाजल्यापासून घरातून बेपत्ता होती. बराच वेळ घरी न परतल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी परिसरात तिचा शोध सुरू केला, मात्र ती कुठेच आढळून आली नाही.
यानंतर कुटुंबीयांनी तिचे सोशल मीडिया अकाउंट तपासले असता, काजलने सायंकाळच्या सुमारास सेलू तालुक्यातील रिधोरा डॅम येथे काही फोटो काढून शेअर केलेले आढळून आले. ही माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने रिधोरा डॅम परिसरात जाऊन पाहणी केली.
तेथे पोहोचल्यावर डॅमजवळ काजलची ॲक्टिव्हा गाडी (क्रमांक MH 32 AB 3679) उभी असल्याचे दिसून आले. तसेच डॅमच्या काठावर तिची बॅग, चप्पल आणि मोबाईल फोन सुद्धा आढळून आला. त्यामुळे कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
घटनास्थळी सेलू पोलिस ठाण्याचे ठाणेदार व पोलीस पथक दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने डॅममध्ये शोधमोहीम सुरू करण्यात आली. काही वेळाच्या शोधानंतर पाण्यातून काजलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सेलू पोलिस स्टेशनकडून सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

गणेश खोडके सह रोशन वांदिले स्क्रिप्ट सेलू

पालकमंत्र्यांकडून सेलू तालुक्याला २५ कोटींच्या निधीची भेट
आज फोकस में

पालकमंत्र्यांकडून सेलू तालुक्याला २५ कोटींच्या निधीची भेट

सेलू हादरलं! 8 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा बळी घेणारा बेफाम ट्रक अखेर पोलिसांच्या जाळ्यात — पण निर्ढावलेला चालक अजूनही फरार!
आज फोकस में

सेलू हादरलं! 8 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा बळी घेणारा बेफाम ट्रक अखेर पोलिसांच्या जाळ्यात — पण निर्ढावलेला चालक अजूनही फरार!

सेलू उड्डाण पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात 12 वर्षीय निष्पाप मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
आज फोकस में

सेलू उड्डाण पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात 12 वर्षीय निष्पाप मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

सेलू बसस्थानकात प्रवाशांचे हाल; दूषित पाणी, बंद पंखे आणि अमली पदार्थ सेवनाच्या तक्रारींनी नागरिक संतप्त
आज फोकस में

सेलू बसस्थानकात प्रवाशांचे हाल; दूषित पाणी, बंद पंखे आणि अमली पदार्थ सेवनाच्या तक्रारींनी नागरिक संतप्त

<span class=सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर तरुणीची रिधोरा डॅममध्ये उडी">
आज फोकस में

सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर तरुणीची रिधोरा डॅममध्ये उडी

सेलू शहरात विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणला
आज फोकस में

सेलू शहरात विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणला

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

मंगलवार, 31 मार्च 2026

आज का सुविचार

आपका चरित्र आपकी सबसे बड़ी पूंजी है। इसे धन, पद या प्रसिद्धि से भी ऊपर रखें। एक अच्छा चरित्र आपको वह सम्मान दिलाएगा जो कोई और चीज नहीं दिला सकती।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp