Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

महा-ई सेवा व आधार केंद्र चालकांचे आज मुंबईत धरणे आंदोलन

Author Image
Written by
Ganesh Khodke

महाराष्ट्रातील महा-ई सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज, ९ मार्च २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. अखिल स्तरीय महा-ई सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले असून राज्यभरातील सर्व केंद्र चालकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील महा-ई सेवा केंद्र चालक तसेच आधार सेवा केंद्र चालक अनेक वर्षांपासून विविध शासकीय सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत. मात्र, या सेवा देताना त्यांना अनेक प्रशासकीय अडचणी तसेच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने केंद्र चालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष द्यावे, तसेच त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील सर्व महा-ई सेवा केंद्र चालक, आधार सेवा केंद्र चालक तसेच VLE बांधवांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी आवाज बुलंद करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे आंदोलन केंद्र चालकांच्या हक्कांसाठी, त्यांच्या व्यवसायाच्या भविष्याकरिता तसेच शासनापर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आले असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांतून केंद्र चालक मुंबईकडे रवाना झाले असून आझाद मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे शासनाचे लक्ष वेधले जाईल आणि केंद्र चालकांच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय होईल, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पालकमंत्र्यांकडून सेलू तालुक्याला २५ कोटींच्या निधीची भेट
आज फोकस में

पालकमंत्र्यांकडून सेलू तालुक्याला २५ कोटींच्या निधीची भेट

सेलू हादरलं! 8 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा बळी घेणारा बेफाम ट्रक अखेर पोलिसांच्या जाळ्यात — पण निर्ढावलेला चालक अजूनही फरार!
आज फोकस में

सेलू हादरलं! 8 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा बळी घेणारा बेफाम ट्रक अखेर पोलिसांच्या जाळ्यात — पण निर्ढावलेला चालक अजूनही फरार!

सेलू उड्डाण पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात 12 वर्षीय निष्पाप मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
आज फोकस में

सेलू उड्डाण पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात 12 वर्षीय निष्पाप मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

सेलू बसस्थानकात प्रवाशांचे हाल; दूषित पाणी, बंद पंखे आणि अमली पदार्थ सेवनाच्या तक्रारींनी नागरिक संतप्त
आज फोकस में

सेलू बसस्थानकात प्रवाशांचे हाल; दूषित पाणी, बंद पंखे आणि अमली पदार्थ सेवनाच्या तक्रारींनी नागरिक संतप्त

सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर तरुणीची रिधोरा डॅममध्ये उडी
आज फोकस में

सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर तरुणीची रिधोरा डॅममध्ये उडी

सेलू शहरात विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणला
आज फोकस में

सेलू शहरात विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणला

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

मंगलवार, 31 मार्च 2026

आज का सुविचार

आपका चरित्र आपकी सबसे बड़ी पूंजी है। इसे धन, पद या प्रसिद्धि से भी ऊपर रखें। एक अच्छा चरित्र आपको वह सम्मान दिलाएगा जो कोई और चीज नहीं दिला सकती।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp